छावा चित्रपटानंतर औरंगजेब चर्चेत आला. राज्यातील राजकारणात गेले काही दिवस औरंगजेबवर घमासान सुरु आहे.
1 April 2025
Created By : Jitendra Zavar
औरंगजेबच्या नावावर महाराष्ट्रात औरंगाबाद शहर होते. त्याचे नामकरण आता छत्रपती संभाजीनगर करण्यात आले. परंतु देशात औरंगजेबच्या नावावर 177 शहरे आहेत.
2011 च्या जनगणनानुसार देशात 177 गाव, शहरांची नावे औरंगजेब या मुघल बादशाहच्या नावावर आहे.
दिल्लीतील एका रस्त्याला औरंगजेबचे नाव दिले होते. 2015 मध्ये दिल्ली महानगरपालिकेने ते नाव बदलून डॉ एपीजे अब्दुल कलाम रोड केले.
औरंगाबादच्या नावावर सर्वात प्रसिद्ध शहरांचे नाव औरंगाबाद आहे. देशभरात असे 63 औरंगाबाद आहे. त्यातील 48 औरंगबाद उत्तर प्रदेशमध्येच आहेत.
औरंगजेबच्या नावावरुन औरंगापुरा (35), औरंगानगर (3), औरंगजेबपुर (13), औरंगपोर (7) आणि औरंगाबर (1) शहरे देशात आहेत.
भारतातील 38 गावांचे औरंगजेबच्या नावावर आहेत. त्यात औरंगाबाद खालसा, औरंगाबाद दालचंद अशी नावे आहेत.
उत्तराखंडमधील धामी सरकारने 4 जिल्ह्यांची नावे बदलली. त्यात औरंगजेबपूर असलेल्या जिल्ह्याचे नाव शिवाजी नगर करण्यात आले.
हे ही वाचा...
IAS अधिकाऱ्यांना कोण बरखास्त करु शकतो? देशाच्या CM, PM कडेही नाही ही पॉवर