फ्री वायफाय वापरणं पडू शकतं महागात, फोन कनेक्ट करण्याआधी 100 वेळा विचार करा!

 12  नोव्हेंबर 2024

Created By: संजय पाटील

सिनेमा आणि गेम्स डाऊनलोड करण्यासाठी फ्री वायफाय वापरताय? तर आताच थांबा आणि 100 वेळा विचार करा

फ्री इंटरनेटसाठी मोबाईल Unknown वायफायसह कनेक्ट करण्याची सवय तुमचं बँक खातं रिकामी होण्याचं कारण ठरु शकतं

फ्री वायफाय नेटवर्क सेफ नसतात. अनेक हॅकर्स तुमचा डेटा, वैयक्तिक माहिती, क्रेडिट कार्ड संबंधित माहिती जाणून घेऊ शकतात

फ्री वायफाय नेटवर्कद्वारे तुमच्या मोबाईलमध्ये व्हायरस पोहचू शकतो, जे हॅकर्ससाठी फायदेशीर ठरतं आणि तुमची माहिती त्यांना मिळण्याची शक्यता वाढते

फ्री वायफाय कनेक्ट केल्यास तुम्ही मोबाईलद्वारे ऑनलाईन काय काय करता? हे हॅकर्सला समजू शकतं

फ्री वायफाय वापरुन बॅकिंग आणि आर्थिक व्यवहार करण्याची चूक करु नये

फ्री वायफायद्वारे कोणत्याही साईटवर बँकिंग संबंधित माहिती किंवा महत्त्वाची माहिती देऊ नये