हिंदू धर्मातील काही परंपरांनुसार, जावयाला त्याच्या सासू-सासऱ्यांचे अंत्यसंस्कार करण्याची परवानगी नाही, त्यामागे अनेक मान्यता आहेत.
जावयाला सासरचा पूर्ण सदस्य मानलं जात नाही, तो फक्त मुलीचा पती असतो. त्यामुळे एखाद्या मुलाला असतात, तशी धार्मिक कर्तव्यं त्याला लागू होत नाहीत.
काही मान्यतांनुसार, सासऱ्याच्या मृत्यूनंतर जावयाने सासूरवाडी सोडावी अशी अपेक्षा असते. अंतिम संस्कार न करण्याची ही प्रथा अशा पद्धतीने वेगळे होण्याची एक पद्धत मानली जाते.
काही भागांत जावयाला यमदूताच्या रूपात पाहिले जाते. त्यामुळे त्याच्यापासून अंतर राखलं जातं. गरूड पुराणानुसार, अंत्यसंस्कारांचा पहिला हक्क हा मृताच्या मुलाला असतो.
पण जर मुलगा नसेल तर नातू, मुलीचा मुलगा आणि त्यानंतर कुटुंबातील इतर पुरूष सदस्य ( भाऊ, भावाचा मुलगा) अंत्यसंस्कार करू शकतात.
आधुनिक काळात या पारंपारिक मान्यतांमध्ये बदल होताना दिसतोय. अनेक ठिकाणी जावयाचे सासरच्यांशी घनिष्ठ संबंध असतात आणि त्यांच्या अंतिम इच्छेचा मान राखतात.
आधीपासून ज्या परंपरा चालत आल्यात त्यानुसार, जावयाला सासू-सासऱ्यांचे अंत्यविधी करण्याची परवानगी नसते. पण बदलता काळ आणि परस्पर संमतीने या प्रथा बदलताना दिसत आहेत.