Chanakya Niti : तुमच्या बायकोमध्ये असतील 'हे' गुण तर नशीब उजळेल

16 July 2024

Created By :  Manasi Mande

भारतातील विद्वानांपैकी एक असलेले आचार्य चाणक्य यांनी नीति शास्त्रात बऱ्याच गोष्टींचा उल्लेख केलाय.

आचार्य चाणक्यांनी नीति शास्त्रामध्ये महिलांच्या अनेक गुणांचेही वर्णन केले आहे.

आचार्य चाणक्यांच्या सांगण्यांनुसार, ज्या व्यक्तींच्या जीवनात अशा गुणवंत महिला असतात ते खूप नशीबवान असतात.

स्त्री ही दयाळू असते. ज्या महिलांमध्ये दयेची भावना असते, अशी स्त्री ज्यांच्या आयुष्यात असते ते पुरूष नशीबवान असतात.

गोड बोलणारी स्त्री आयु्ष्यात असेल तर तुम्ही आणि कुटुंबियाही नशीबवान आहात. मधुर वाणी असलेली स्त्री सर्वांनाच आवडते.

बचत करणारी गृहिणी असेल तर कधीच धन-धान्याची कमतरता जाणवत नाही. अशी स्त्री ज्यांच्या आयुष्यात येते त्या पुरूषांची प्रगती होते.

ज्या स्त्रीच्या मनात मोठ्यांप्रती आदर आणि लहानांसाठी  प्रेम असते, अशी स्त्री घरात असणं हे भाग्याचं लक्षण असतं.

ज्यांना धर्माबद्दल आस्था असते आणि नियमित पूजा-पाठ करतात अशा स्त्रियांच्या घरात सुख-समृद्धी नांदते.