Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याचं नाव काय ?
19 February 2025
Created By : Manasi Mande
छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 395 वी जयंती देशभरात उत्साहाने साजरी करण्यात येत आहे. त्यांच्याशी निगडीत अनेक गोष्टी आहेत ज्या ऐकून ऊर अभिमानाने भरून येतो.
शिवाजी महाराज यांनी अनेक लढाया जिंकल्या. त्यांच्या घोड्यांचेही त्यात खास योगदान होते. त्यांच्या अश्वांची नावेही विशेष होती.
काही इतिहासकारांनुसार, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोड्याचे नाव विश्वास होतं, पण काहींचं म्हणणं वेगळं आहे.
काही इतिहासकारांच्या सांगण्यानुसार, महाराजांच्या अश्वाचे नाव कृष्णा असं होतं. मात्र त्यांच्याकडे अनेक अश्व होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे काही अन्य अश्व होते, त्यांचं ना मोती, विश्वास, तुरंगी, रणवीर , गजरा आणि इंद्रायणी होतं असं म्हटलं जातं.
छत्रपती शिवाजी महाराजांकडे जे घोडे होते ते दख्खनी होते. त्यांचा वापर लढाईत केला जायचा. हे अश्व त्यांच्या वेगासाठी खूप प्रसिद्ध होते.
शिवरायांनी लढाईत भीमथडी घोड्यांचाही वापर केला. त्यांनी अनेक यु्द्धही जिंकली.