coriander (10)

कोलेस्ट्रॉल शरीरात मेनासारखा पदार्थ आहे. संतुलित अन् योग्य आहार नसल्यास शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलची समस्या वाढते. 

20 March 2025

coriander (9)

कोलेस्ट्रॉल दोन पद्धतीचे असतात. गुड कोलेस्ट्रॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉल. शरीरात बँड कोलेस्ट्रॉल वाढल्यावर रक्तवाहिन्या ब्लॉक होतात. त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाहास अडचण निर्माण होते. 

coriander (8)

ह्रदय अन् मेंदूत योग्य प्रमाणात रक्त पुरवठा झाला नाही तर स्ट्रोक किंवा हॉर्ट अटॅक येवू शकतो. परंतु काही घरगुती उपाय केल्यास रक्तवाहिन्यांमधील बॅड कोलेस्ट्रॉल निघू शकतो. 

coriander (7)

कोथिंबीर रक्तवाहिन्यांमधील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरते. यामध्ये फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.

कोथिंबीर आपल्या पाचन तंत्रात सुधारणा करते आणि ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित करते. 

सकाळी रिकाम्या पोटी कोथिंबीरच्या बियांचे पाणी घेतल्यास वजन कमी होते. त्याचे नियमित सेवन केल्यावर हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही कमी होतो.

एक चमचे कोथिंबीरच्या बिया म्हणजे धने रात्री पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे पाणी गाळून सेवन करा. 

धने टाकलेले हे पाणी गाळून कोमट करुनही तुम्ही पिऊ शकता. यामुळे तुमचे पोटही व्यवस्थित साफ होईल.

धने असलेल्या या पाण्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल वेगाने कमी होतो. काही अडचण आल्यास डॉक्टरांशी संपर्क करावा.