भारतीय रेल्वे जगातील चौथ्या क्रमांकाचे रेल्वे नेटवर्क आहे. देशात 8800 रेल्वे स्टेशन आहेत. ही स्टेशन रेल्वेच्या मालकीचा आहे.

1 April 2025

Created By : Jitendra Zavar

देशात आता खासगी रेल्वे स्टेशनही झाले आहे. देशातील पहिले खासगी रेल्वे स्टेशन कोणते? हे माहीत आहे का?

खासगी रेल्वे स्टेशनवर एखाद्या विमानतळावर मिळतात, त्या पद्धतीने सुविधा मिळतात. हे स्टेशन मध्य प्रदेशात आहे. 

मध्य प्रदेशातील राणी कमलापती रेल्वे स्टेशन देशातील पहिले खासगी रेल्वे स्टेशन आहे. पीपीपी मॉडलवर हे स्टेशन विकसित करण्यात आले आहे. 

राणी कमलापती रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा दिल्या गेल्या आहेत. 

राणी कमलापती रेल्वे स्टेशनचे संचालन खासगी संस्था करत असली तरी त्याची मालकी भारतीय रेल्वेकडेच आहे. 

राणी कमलापती रेल्वे स्टेशनचे नूतनीकरणाचे काम इंडियन रेल्वे स्टेशन्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने केले आहे.  

भोपाळमधील हबीबगंजमध्ये राणी कमलापती रेल्वे स्टेशन आहे. रेल्वे स्टेशनवर शॉपिंग सेंटर, रेस्टरंट, पार्किंग सुविधा आहे. 

महिला प्रवाशांसाठी या स्टेशनवर वेगळ्या सुविधा दिल्या आहे. रेल्वे स्टेशनवर उर्जा सोलर पॅनलच्या माध्यमातून मिळते.