भारतात सर्वाधिक प्रवाशी रेल्वेने प्रवास करतात. रेल्वे स्वस्त आणि मस्त प्रवासाचे साधन आहे.
21 December 2024
भारतात रेल्वेचे नेटवर्क व्यापक आहे. त्यात आता वंदे भारत या सेमी हायस्पीड ट्रेनची भर पडली आहे.
देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन आता तयारी झाली आहे. लवकरच ती धावणार आहे.
वंदे भारत ट्रेनमध्ये अनेक सुविधा आहेत. अग्निशमन यंत्र, प्रत्येक बेडजवळ इमरजन्सी बटन आहे.
वंदे भारत ट्रेनचे सीट आरामदायी आहेत. त्याचे कुशन चांगले आहे. अनेक मॉर्डन फॅसिलिटी त्यात आहे.
वंदे भारत ट्रेनमध्ये सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञान दिले आहे. प्रत्येक डब्यात सीसीटीव्ही अन् चार्जिंग केबल आहे.
प्रत्येक बेडजवळ एक लहान लाईट आहे. त्यामुळे तुम्हाला आरामात वाचन करता येईल.
एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाण्यासाठी अॅटोमॅटीक दरवाजे आहेत. तसेच इमरजन्सी टॉक बॅकअप युनिट आहे.
शौचालयात बटन न दाबताच पाणी मिळणार आहे. तसेच टच करताच दरवाजा उघडणार आहे.
हे ही वाचा... आराध्याची अॅक्टींग पाहून अमिताभ यांनी वाजवल्या टाळ्या, अभिषेक-ऐश्वर्याने बनवला व्हिडिओ