दही हा भारतीय आहार पद्धतीचा अविभाज्य घटक आहे. उन्हाळ्यात दही खाणे आरोग्यदायी आहे.
17 February 2025
दह्यामध्ये प्रोटीन्स असतात. तसेच शरीराला आवश्यक असलेले चांगले बॅक्टेरियादेखील मोठ्या प्रमाणावर असतात.
बाजारातून विकत आणलेले दही एकदम घट्ट असते. पण विरजण टाकून घरी केलेले दही घट्टी होत नाही, असे अनेकांच्या बाबतीत होते.
घट्टी दही जमवण्यासाठी दूध पूर्ण उकळून घ्या. त्यानंतर ते कोमट होण्याची वाट पाहा. त्यानंतर त्यात एक चमचा विरजण टाका.
विरजण टाकलेले दूध एका भांड्यात ठेवून ते एल्युमिनिय फॉयलने झाकून घ्या. त्यानंतर प्रेशर कुकरमध्ये अर्धा ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवा.
कुकरमधील पाणी उकळू लागल्यावर त्यात ते विरजण असलेले भांडे ठेवा. त्यानंतर कुकरची शिट्टी काढून झाकन बंद करुन घ्या.
पंधरा मिनिटे ते विरजण असलेले दूध कुकरमध्ये राहू द्या. त्यानंतर भांडे बाहेर काढून थंड होऊ द्या.
भांडे थंड झाल्यावर तुम्हाला बाजारात मिळते तसे घट्ट दही जमलेले दिसेल.
घट्ट दह्याचे दर्शन घडेल्यावर खवय्यांच्या जिभेला पाणीही सुटेल.
हे ही वाचा... व्हिटॅमिन B 12 जास्त वाढल्यास धोकाच, तर या वस्तू खाणे टाळा