अंडी खाल्ल्याने कोलेस्ट्ऱॉल वाढतं का ?

20 October 2024

Created By : Manasi Mande

अंडी खाल्ल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढू शकतं असं अनेकांचं म्हणणं आहे. कारण अंड्यात कोलेस्ट्ऱॉल भरपूर असतं.

एका मोठ्या अंड्यात सुमारे 186 मिलीग्राम कोलेस्ट्ऱॉल असतं. आणि लोकांनी दररोज 300 मिलीग्राम पेक्षा कोलेस्ट्रॉल सेवन करू नये.

डाएटिशियनच्या सांगण्यानुसार, एका दिवसांत 2 पेक्षा अधिक अंडी खाऊ नयेत, नाहीततर बॅड कोलेस्ट्ऱॉल वाढू शकतं.

हेल्थ एक्स्पर्टनुसार, हाय कोलेस्ट्ऱॉलचा त्रास असेल त्यांनी कमी अंडी खावीत, अन्यथा त्रास होऊ शकतो.

शरीरात कोलेस्ट्ऱॉल लेव्हल वाढली तर ते धमन्यांमध्ये साचतं आणि रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो.

रक्तप्रवाह नीट होत नसेल तर हार्ट अटॅकही येऊ शकतो.

अंड्याचे सेवन शरीरासाठी फायदेशीर असतं कारण त्यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन, मिनरल्स ओमेगा-3 फॅटी ॲसिड असतं.

अंडी हा स्वस्थ आहार असला तरी ते एका ठराविक प्रमाणातच खाल्लं पाहिजे.