Created By: अतुल कांबळे
11 April 2025
Created By: अतुल कांबळे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोणते खाद्यपदार्थ आवडायचे ?
13 April 2025
Created By: अतुल कांबळे
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आहार एकदम संतुलित होता, पण काही पदार्थ त्यांना खूप आवडायचे
बाबासाहेब परदेशात शिकले असल्याने त्यांना चांगले जेवण बनवता यायचे
परदेशी पदार्थ देखील ते खायचे, परंतू त्यांचे प्रेम भारतीय पदार्थांवरच होते
पॉरीज वा कॉर्न फ्लेक्स, कधी उकडलेली अंडी तर कधी हाफ बॉईल, भुर्जी, टोस्ट, बटर आणि जॅम असा नाश्ता ते करत
नाश्ता झाल्यानंतर ते कॉफी पित, चहा घेताना त्यांना उकळलेला चहा तसेच दूध आणि साखर स्वतंत्र भांड्यातून द्यावी लागायची
त्यांना जेवणात साधा शिजवलेला भात आणि मसूर डाळीची आमटी आणि चपाती आवडायची.
बाबासाहेबांना साधा शिजवलेला भात आणि दही खायला देखील खूप आवडायचे
त्यांना सीफूड आवडायचे, पहिली पत्नी रमाबाई यांच्या हातची बोंबील चटणी आणि भाकरी ते अगदी आवडीने खायचे
त्यांना सर्व प्रकारचे मासे आवडायचे, हिलसा मासा ते कोलकाता येथून विमानाने मागवायचे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे किती डिग्री होत्या ?