शरीर हेल्दी ठेवण्यासाठी अनेक प्रकारच्या पोषक तत्वांची गरज असते. 

11 डिसेंबर 2024

शरीरासाठी व्हिटॅमिन खूप महत्वाचे असते. व्हिटॅमिन B 12 डिएनएची निर्मिती करते. तसेच मज्जासंस्थांवर नियंत्रण ठेवण्याचे काम करते.

हिवाळ्यात व्हिटॅमिन B 12  वाढवण्यासाठी रोज दही खाणे सुरु करा. याबाबत एक्सपर्ट काय म्हणतात, पाहू या.

श्री बालाजी अ‍ॅक्शन मेडिकल इंस्टीट्यूटच्या प्रमुख डायटिशियन प्रिया पालीवाल म्हणतात, दहीसोबत काही वस्तूंचे सेवन केल्यावर व्हिटॅमिन बी12 ची कमतरता दूर होते. 

हिवाळ्यात दह्यासोबत गुळ खाल्याने व्हिटॅमिन बी12 चांगला वाढतो. तसेच आयरनची कमतरता दूर होते. 

दहीसोबत आक्रोड, बदाम खाल्ल्यास व्हिटॅमिन बी12 चा स्तर चांगला होतो. 

दही थंड असल्यामुळे रात्री खाण्याऐवजी दिवसा खावे, असे तज्ज्ञ सांगतात.