लिव्हर (यकृत) हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. लिव्हर रक्त शुद्ध करते आणि पचन सुधारते.
14 April 2025
Created By : Jitendra Zavar
शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकणे हे यकृताचे काम आहे. लिव्हर शरीरात ऊर्जा निर्माण करते आणि हार्मोनल संतुलन राखते.
यकृत बिघडते तेव्हा शरीरात विषारी पदार्थ जमा होऊ लागतात आणि व्यक्तीला थकवा आणि अशक्तपणा जाणवतो.
लिव्हर चांगले ठेवण्यासाठी काही गोष्टींचे नियमित सेवन केले पाहिजे. त्यात डाळिंब ज्यूस महत्वाचे आहे.
डाळिंब अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. हे यकृतातील जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत करते.
आल्यामध्ये जिंजरॉल असते जे एक शक्तिशाली संयुग आहे. हे चरबीचे पचन करण्यास मदत करते आणि चयापचय वाढवते.
अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध ग्रीन टी यकृताचे कार्य सुधारते. यामुळे दिवसातून कमीत कमी दोनदा सेवन केले जाऊ शकते.
आवळ्याच्या रसात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते. रोज सकाळी एक ग्लास आवळ्याचा रस प्यायल्याने यकृताचे कार्य सुधारते.
हळदीमध्ये सक्रीय संयुग कर्क्यूमिन असते. हळद कोमट दुधात मिसळून सेवन केल्यावर यकृताच्या पेशी सक्रीय होतात. ज्यामुळे यकृत निरोगी राहते.
हे ही वाचा...
Thanks अन् Thank You या दोन शब्दांमध्ये फरक आहे. त्याची माहिती अनेकांना नसते.