नेल कटरचा वापर नखे कापण्यासाठी जवळपास सर्वच जण करत असतात.
10 जानेवारी 2025
नेल कटरचा खाली असणारे होल सर्वांनी पाहिले आहे. परंतु ते निरुपयोगी असल्याचे त्यांना वाटत असेल.
नेल कटरचा हा भाग खूप कामाचा आहे.
नेल कटरला लावण्यात आलेले ब्लेड या होलशी जोडले गेलेले असतात. त्यामुळे ते ब्ले़ड फिरवणे, उघडणे, बंद करणे सोयीचे होतात.
होलचे काम नेल कटरला चांगली ग्रिप देण्याचे असते. तसेच कापलेला नख नेल कटरमध्ये फसण्याची शक्यता असते. शेवटी बनवण्यात आलेले हे होल नख कटरच्या बाहेर काढण्यासाठी उपयोगी होते.
होल एखाद्या रिंग प्रमाणे काम करते. त्यामुळे चावीसोबत त्याचा वापर करता येतो. त्यामुळे एखाद्या ठिकाणी ठेऊन विसर पडण्याची समस्याही होत नाही.
होल नख कापण्यासाठी कामाचे नाही. परंतु घरगुती वापरासाठी ते उपयोगी आहे. एखादी तार वाकवण्यात अडचण येत असेल तर तुम्ही या होलच्या मदतीने ते काम करु शकतात.
नेल कटरमध्ये लावण्यात आलेले दोन ब्लेड नखे स्वच्छ करण्याशिवाय इतर कामांसाठीही उपयोगी आहे.
एखादी वस्तू कापणे, बॉटलचे झाकण उघडणे यासाठी त्याचा वापर होऊ शकतो.
नट बोल्ट उघडण्यासाठी ब्लेडचा वापर करता येतो. डासांसाठी असणारी कॉईल लावण्यासाठी त्याचा उपयोग करता येतो.