दारुच्या चाहत्यांना Black dog आणि Monkey Shoulder व्हिस्कीचे नाव माहीत असणार आहे. 

2 जानेवारी 2025

व्हिस्कीचे नाव प्राण्यांच्या नावावर का ठेवण्यात आले? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कधी मिळाले का?

मंकी शोल्डर वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, हे नाव मॉल्ट व्हिस्की बनवण्याच्या पारंपरिक प्रक्रियेमुळे दिले आहे. 

व्हिस्की बनवण्यासाठी काही व्यक्ती मॉल्टेड बार्ले म्हणजे फावड्यांनी ती उलटसुलट करतात.

हे काम करणाऱ्या लोकांना मॉल्ट मॅन म्हणतात. अनेक वर्ष हे काम केलेल्या लोकांना काही जखमाही झाल्या.

जखमांमुळे मॉल्ट मॅन खांदे वर घेत असत आणि हात विशिष्ट पद्धतीने लटकत असत. त्यामुळे ते काहीसे माकडांसारखे दिसत होते. 

या लोकांच्या या अस्थाई आजाराला मंकी शोल्डर नाव दिले गेले. 

कंपनी म्हणते, व्हिस्की तयार करण्याच्या त्या परंपरेचे सन्मान म्हणून त्यांच्या बँडला मंकी शोल्डर नाव दिले.

ब्लॅक डॉग नावाबाबत कंपनीच्या वेबसाइटवर माहिती दिली आहे. 

व्हिस्की पहिल्यांदा बनवणारे सर वॉल्टर मिलर्ड यांना मासे पकडण्याची आवड होती. 

मासे पकडण्यासाठी ते  'फिशिंग फ्लाई' चा वापर करत होते. व्हिस्की मेकर मिलर्ड यांनी 1883 मध्ये हा ब्रँड सुरु केला.

'फिशिंग फ्लाई'ला 'ब्लॅक डॉग' म्हटले जाते. यामुळे ब्लॅक डॉग व्हिस्कीच्या बाटलीवर मासे पकडण्याचा त्या कांटाचा लोगो आहे.