12 जानेवारी 2025
खरं शिलाजीत कसं बनतं? माहिती आहे का? नसेल तर जाणून घ्या
पर्वताच्या खडकांमधून निघणाऱ्या शिलाजीतचे गुण सर्वांनाच माहिती आहेत. पण हे कसं तयार होतं ते माहिती आहे का?
शिलाजीत मध्य आशियातील पर्वतांमध्ये आढळतं. हिमालयाच्या उंच शिखरांव्यतिरिक्त पाकिस्तानच्या गिलगिट-बाल्टिस्तानच्या पर्वतांमध्ये आढळतं.
शिलाजीत तयार होण्याची प्रक्रिया नैसर्गिक आहे. खडकांमध्ये असलेल्या धातू आणि वनस्पतींने हे बनतं. वर्षानुवर्षे चालणारी ही प्रक्रिया आहे.
शिलाजीत हे दगडासारखं दिसतं. पण प्रत्येक व्यक्ती ते ओळखू शकत नाही. त्यामुळे त्याच्यावर प्रक्रिया सुरु होते.
बीबीसी रिपोर्टनुसार, दगडासारखं दिसणारं शिलाजीतचे छोटे तुकडे केले जातात. या तुकड्याने निश्चित मात्रा असलेल्या पाण्याच्या बादलीत ठेवलं जातं.
पाण्यात टाकल्यानंतर ते चमच्याने ढवळलं जातं. काही तासात ते त्यात विरघळते आणि पाण्यातून घाण वगैरे काढली जाते.
आठवड्याभरानंतर गाळून शिलाजीत उकळलं जातं. अनेक कंपन्या मशिनचा वापर करतात. काचेच्या जारमध्ये पाणी सुकवलं जातं. त्यानंतर वापर केला जातो.