ट्रेनमध्ये मिळणारी चादर कितीवेळा धुतली जाते ?

28 November 2024

Created By : Manasi Mande

ट्रेनचा प्रवास करताना जो बेडरोल मिळतो तो कितीवेळा धुतला जातो, प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न येतच असेल.  

काँग्रेसचे खासदार कुलदीप इंदौरा यांनी रेल्वे मंत्र्यांना प्रश्न विचारला की ही चादर कितीवेळा धुतली जाते ?

त्यावर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की ट्रेनमध्ये मिळणारी रजई ( जाड चादर) महिन्यातून कमीत कमी एकदा तरी धुतली जातेच.

भारतीय रेल्वेमध्ये मिळणाऱ्या चादरी, रजई खूप हलक्या असतात. त्यामुळे त्यांची धुलाई सहजतेने होते.

बेडरोलमध्ये मिळणारी चादर, टॉवेल आणि रजई यांची धुलाई वॉशिंग मशीनमध्ये होते.

धुतल्या गेलेल्या पांढऱ्या चादरींच्या स्वच्छतेबाबत जाणून घेण्यासाठी व्हाईटो मीटरचा वापर केला जातो.

गरज पडल्यास ट्रेनमध्ये नव्या चादरी नेहमी उपलब्ध असतात.