shave (9)

अनेकांना नियमित दाढी करण्याची सवय असते. परंतु काही जण दाढी वाढवत असतात.

Tv9-Marathi

10 जानेवारी 2025

shave (7)

दाढी ठेवल्यामुळे काहींना अडचण वाटत असते. त्यामुळे महिन्याभरातून किती वेळा दाढी करावी, हा प्रश्न आहे.

shave (6)

महिन्याभरातून किती वेळा दाढी करावी, यासंदर्भात मेडीकल सायन्समध्ये काही नियम नाही. हे तुमची आवड आणि तुमची त्वचा यावर अवलंबून असते.

shave (5)

डर्मेटोलॉजिस्ट म्हणतात, आठवड्यातून एक वेळा दाढी केली पाहिजे. महिन्यातून चार-पाच दाढी करणे योग्य असल्याचे म्हटले जाते. 

ज्या लोकांची त्वचा संवेदनशील आहे, त्यांनी रोज दाढी करु नये. कारण त्यामुळे त्वचासंदर्भातील समस्या होऊ शकतात. 

लेझर रोज चेहऱ्यावर चालवल्यामुळे त्वचेवरील एक लेअर काढली जाते. त्यामुळे त्वचेला पूर्ववत होण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात. 

महिन्याभर दाढी किंवा कायम दाढी ठेवणाऱ्यांनी दाढीची नियमित स्वच्छता केली पाहिजे. कारण दाढीत खूप घाण साचली जाण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम त्वचेवर होऊ शकतो. 

डिस्क्लेमर- आमचा लेख केवळ माहिती देण्यासाठी आहे. अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.