11 नोव्हेबर 2024
दरवर्षी भारतात किती चिकन खाल्लं जातं?
Created By: राकेश ठाकुर
चिकन हे जगभरातील अनेक देशांमध्ये खाल्लं जातं. पण भारतात याचं प्रमाण अधिक आहे.
वर्ल्ड पॉपुलेशन रिव्ह्यूने आपल्या अहवालात सांगितलं की, जगातील कोणत्या देशात सर्वाधिक चिकन खाल्लं जातं.
2022 च्या रिपोर्टनुसार, चीनमधील लोकं सर्वाधिक चिकन खातात. यात भारताचा सहावा क्रमांक लागतो.
रिपोर्टनुसार, भारतात इतकं चिकन खाल्लं जातं की जापान, इंडोनेशिया आणि ब्रिटेन हे देश मागे पडलेत.
रिपोर्टनुसार, भारतातील लोकं दरवर्षी 4946 मेट्रिक टन चिकन खातात. भारतात चिकनच्या अनेक डिश तयार केल्या जातात.
भारतात सर्वाधिक तंदूर चिकन, चिकन लबाबदार, चिकन मोमोज आणि चिकन बर्गर खाल्लं जातं.
भारतीय लोकांना चिकन बिर्याणीही आवडते. चिकन बिर्याणीचेही वेगवेगळे प्रकार आहेत.