5 डिसेंबर 2024
खजूरमध्ये फायबर, पोटॅशियम, मॅग्नीशियम, कॉपर, आयरन, व्हिटामिन बी 6 या सारखे पोषक तत्व आहेत.
हिवाळ्यात खजूरचे सेवन करणे फायदेशीर आहे. त्याच्या फायद्याबाबत एक्सपर्ट काय म्हणतात, पाहू या.
न्यूट्रिशनिस्ट डॉक्टर मेधावी गौतम म्हणतात, खजूर खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यांच्या सेवनामुळे शरीराला एनर्जी मिळते.
खजूरच्या सेवनामुळे सर्दी खोकला दूर होतो. त्यामुळे शरीर गरम राहते.
रात्री दूध गरम करुन त्यात दोन ते तीन खजूर टाका. शरीरासाठी ते फायदेशीर राहणार आहे.
खजूर नैसर्गिक साखरचे काम करतो. त्यामुळे दुधात साखर टाकण्याची गरज नाही. खजूरमधील गोडपणा दूध गोड करते.
खजूरमध्ये नैसर्गिक साखर असल्यामुळे मधूमेह असणाऱ्या रुग्णांनी त्याचे सेवन करु नये.