बायकोला एक टक बघण्यापेक्षा... तो सल्ला देणाऱ्या L&Tच्या चेअरमनचा पगार किती?
10 January 2025
Created By : Manasi Mande
L&T या कंपनीचे अध्यक्ष एस. एन. सुब्रमण्यन हे सध्या त्यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत.
कर्मचाऱ्यांनी रविवासह 90 तास काम केलं पाहिजे, असं विधान त्यांनी केलं.
" सुट्टी घेतल्याने कर्मचाऱ्यांना काय फायदा होतो? घरी बसून काय करता? तुम्ही तुमच्या बायकोकडे किती वेळ बघू शकता? ऑफिसमध्ये जा आणि काम करा,” असं ते म्हणाले.
एस.एन. सुब्रमण्यन यांच्या या विधानाचे बरेच पडसाद उमटले असून सोशल मीडियावर प्रचंड खळबळ माजली आहे.
अभिनेत्री दीपिका पडूकोणसह अनेक लोकांनी सुब्रमण्यन यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे.
90 तास काम करण्याचा सल्ला देणाऱ्या सुब्रमण्यन यांचा पगार किती आहे ? चला जाणून घेऊया.
मीडिया रिपोर्टनुसार, 2023-24 या वर्षात सुब्रमण्यन यांचे वेतन 51 कोटी रुपये होते.
सुब्रमण्यन यांचा पगार L&T कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या तुलनेत 534.57 पट जास्त आहे.