23 नोव्हेबर 2024
निवडणुकीत डिपॉझिट जप्त झाले तर किती पैसे पाण्यात जातात?
Created By: राकेश ठाकुर
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर झाला आहे. अनेकांना निकालात त्यांची अनामत रक्कम वाचवता आली नाही.
देशात स्थानिक स्वराज्य निवडणुकीपासून लोकसभा आणि राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवाराला ठराविक रक्कम भरावी लागते. याला डिपॉझिट म्हंटलं जातं.
लोकसभेसाठी 25000, विधानसभेसाठी 10000 आणि राष्ट्रपती-उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी 15 हजार सुरक्षा ठेव आहे.
उमेदवाराला एकूण मतांपैकी 1/6 मतं न मिळाल्यास डिपॉझिट जप्त केले जाते.
कोणत्याही जागेवर 1 लाख मतं पडली असतील आणि 5 उमेदवारांना 16,666 पेक्षा कमी मतं पडली तर सर्वांचं डिपॉझिट जप्त होईल.
उमेदवार जिंकला किंवा त्याला 1/6 पेक्षा जास्त मतं मिळाली तर सदर उमेदवाराला सुरक्षा ठेव परत केली जाते.
एखाद्या उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेतल्यास किंवा उमेदवारी रद्द केल्यास, मतदानापूर्वी मृत्यू झाल्यास रक्कम परत केली जाते.