1 December 2024

केंद्र सरकारने सुरक्षेच्या दृष्टीने पॅन 2 प्रकल्प मंजूर केला आहे. 

नवीन पॅन कार्डमध्ये क्‍यूआर कोड असणार आहे. या प्रकल्पावर 1435 कोटी खर्च येणार आहे.

नवीन पॅनकार्डमुळे दोन पॅन कार्ड, बनावट पॅन कार्ड वापरता येणार नाही. 

पॅन 2 प्रकल्पात कार्ड मिळवण्यासाठी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आली आहे. 

NSDL च्या ई-पॅन या www.onlineservices.nsdl.com/paam/requestAndDownloadEPAN.html वेबसाईटवरुन ही प्रक्रिया होणार आहे. 

तुमचा पॅन क्रमांक, आधार क्रमांक आणि जन्म तारीख नमूद करा. 

तुम्हाला एक ओटीपी येईल. तो ओटीपी दहा मिनिटांच्या आत भरा.

पॅनकार्ड येण्यापूर्वी 30 दिवसांसाठी याला कोणतेही शुल्क लागणार नाही. यानंतर 8.26 रुपये आणि जीएसटी लागेल. 

प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर 30 मिनिटांत पॅन तुमच्या ईमेलवर पाठवला जाईल. 

तुम्हाला ईमेलवर पॅन मिळाला नाही तर tininfo@proteantech.in वर संपर्क करावा.