28 जानेवारी 2025
असं बनवाल EPFO एटीएम कार्ड, एका वेळेस किती पैसे काढता येणार!
ईपीएफओ पीएफ होल्डरच्या मदतीसाठी नियमात बदल करण्यात आला आहे. लोकांची अडचण कमी करण्यााच मानस आहे.
रिपोर्टनुसार, सरकारकडून ईपीएफओ 3.0 जून 2025 पर्यंत सादर केलं जाईल.
यात पीएफ फंड एटीएमच्या माध्यमातून काढण्याची सुविधा दिली जाईल. पीएफ होल्डर कधी पैसे काढू शकतात याबाबत अद्याप अधिकृत असं काही सांगितलेलं नाही.
रिपोर्टनुसार, ईपीएफओ 3.0 सह खातेधारक या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. खातेधारकांना एटीएमसाठी पोर्टलवर अर्ज करावा लागेल.
पीएफ खातेधारक एटीएमच्या माध्यमातून फंडाच्या 50 टक्के रक्कम काढू शकतात.
पीएफ खातेधारकाचा मृत्यू झाला तर नॉमिनीही एटीएममधून पैसे काढू शकतो.