11 February 2024

Hug Day Special : आवडत्या व्यक्तीला मिठी मारण्याचे आहेत अनेक फायदे

Mahesh Pawar

व्हॅलेंटाईन वीकचा सहावा दिवस Hug Day म्हणून साजरा करतात.

या दिवशी जोडपे एकमेकांना मिठी मारून आपले प्रेम व्यक्त करतात.

तणावाने भरलेल्या जगात एखाद्याची प्रेमळ मिठी ही भावनिक आणि शारीरिक दोन्ही आजारांवर रामबाण उपाय आहे.

जेव्हा आयुष्य ओझं बनतं तेव्हा एक आलिंगन शक्तिशाली मित्र ठरू शकते.

तणावाच्या काळात सहाय्यक स्पर्शाने मिठी मारल्या जाणाऱ्या व्यक्तीला केवळ सांत्वन मिळतेच शिवाय त्या व्यक्तीचा ताणही कमी होतो.

आलिंगन हे ताण कमी करून रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते.

नियमित आलिंगन देणाऱ्या व्यक्ती आजारी पडण्याची शक्यता कमी असते असे संशोधनातून समोर आले आहे.

मिठी मारणे हे हृदयाच्या आरोग्याचादेखील एक उत्तम उपाय आहे.

जोडीदारांनी एकमेकांना मारलेली मिठी हे रक्तदाब आणि हृदयाची गती नियंत्रित करतात. 

एक मिठी स्त्रियांमधील ऑक्सिटोसिन रक्तदाब आणि ताण कमी करते.

जवळच्या नातेसंबंधांमध्ये मिठीची वारंवारता मग ते रोमँटिक जोडीदाराशी असो किंवा लहान मुलांची असो सकारात्मक परिणाम करते.

लव मॅरेजसाठी पालकांची परवानगी हवीय? फोलो करा या टिप्स