प्रत्येक घरात पाण्याची टाकी असते. ही टाकी कोणत्या दिशेला ठेवावी, याबाबत अनेकांना माहिती नसते.
27 एप्रिल 2025
Created By: जितेंद्र झंवर
वास्तूशास्त्रात पाण्याची टाकी कोणत्या दिशेला ठेवावी, यासंदर्भात सांगितले आहे. त्यामुळे घरात सकारात्मक उर्जा राहते.
जमिनीत तयार केलेली पाण्याची टाकी उत्तर पूर्व दिशेत ठेवणे शुभ आहे. उत्तर-पूर्व दिशा जल तत्वाचे प्रतिनिधित्व करणारी आहे.
उत्तर दिशासुद्धा जमिनीखाली असणाऱ्या पाण्याच्या टाकीसाठी चांगली आहे. त्यामुळे धन अन् संपत्तीत वाढ होते. त्यामुळे घरात पैशांची चणचण भासत नाही.
पूर्व दिशेत जमिनीखाली असणारी पाण्याची टाकी शुभ असते. यामुळे घरात सकारात्मक उर्जा निर्माण होते.
जमिनीच्या वर असणाऱ्या पाण्याच्या टाकीसाठी दक्षिण-पश्चिम दिशा चांगली आहे. दक्षिण पश्चिम पृथ्वी तत्वाचे प्रतिनिधित्व आहे.
पश्चिम दिशा जमिनीवरील पाण्याच्या टाकीसाठी चांगली आहे. शक्य असल्यास दक्षिण पश्चिम दिशेला पाण्याची टाकी ठेवावी.
काही प्रकरणात उत्तर-पश्चिमेतील दक्षिणी भागात टाकी ठेवता येते. परंतु ही खूप मोठी नको. तसेच उत्तर पश्चिम भागापासून लांब ही टाकी ठेवायला हवी.
हे ही वाचा पाकिस्तानी नागरिकांना किती प्रकारचे व्हिसा देत होता भारत