24 डिसेंबर 2024

गूळ बनावट आहे की नाही! कसं ओळखाल? जाणून घ्या

हिवाळ्यात गूळ खाण्याचं प्रमाण वाढतं. कारण शरीरातील उष्णता त्यामुळे वाढते. चहापासून लाडूंमध्ये गुळाचा वापर केला जातो.

गुळात लोह, कॅल्शियम, कॉपर, झिंक, मॅग्नेशियम असे पोषक घटक असतात.गुळामध्ये अनेक पोषक घटक असतात. 

सारखेऐवजी गूळ आरोग्यदायी मानलं जातं. पण आता भेसळयुक्त गूळ बाजारात येतो. 

गूळ बारीक करा आणि पाण्यात मिसळा. भेसळ नसलेला गूळ पाण्यात विरघळेल. तर अशुद्ध गूळ तळाशी बसेल. 

थोडा गूळ घ्या आणि तळहातावर चोळा. तर त्यात तेल दिसून आलं तर चमक वाढवण्यासाठी तेळाची भेसळ केली आहे हे लक्षात येईल. 

गुळाची ढेप हातात घेऊन त्याचं बारकाईने निरीक्षण करा. त्यात बारीक स्फटिक दिसले तर त्यात साखर मिसळलेली असेल. 

हायड्रोक्लोरिक एसिडने गूळ तपासता येते. गुळावर काही थेंब टाका. फेस दिसला तर त्यात भेसळ आहे असं समजून जा.