व्हिटॅमिन बी 12 शरीसासाठी आवश्यक घटक पदार्थ आहे. परंतु शाकाहारी लोकांमध्ये या व्हिटॅमिनची कमरता असते.
7 November 2024
लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी, निरोगी मज्जासंस्थेची देखभाल करण्यासाठी आणि डीएनए कार्यासाठी हे आवश्यक आहे.
व्हिटॅमिन बी 12 आहारातून मिळवावा लागतो. शरीरात त्याची पातळी 300pg/mL पेक्षा जास्त असल्यास नॉर्मल म्हटले जाते.
व्हिटॅमिन बी 12 ची शरीरात कमतरता निर्माण झाली तर अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागते.
व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे हात आणि पाय सुन्न होतात. चेहरा फिकट होतो. त्वचा कोरडी पडते. स्मरणशक्ती कमकुवत होते. व्यक्ती चिडचिड होतो.
शाकाहारी व्यक्तीमध्ये व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता मोठ्या प्रमाणावर असते. ती कमतरता कशी भरुन येऊ शकते हे ते पाहू या.
पौष्टिक यीस्ट एक निष्क्रिय यीस्ट आहे. बहुतेकदा सॅकॅरोमायसेस सेरेव्हिसियाचा एक प्रकार आहे. पौष्टिक यीस्ट एक निष्क्रिय यीस्ट आहे, बहुतेकदा सॅकॅरोमायसेस सेरेव्हिसियाचा एक प्रकार आहे.
पौष्टिक यीस्टमध्ये मुख्य जीवनसत्त्वे B12, B6 आणि B1 असतात. हे सूप, सॅलड किंवा पॉपकॉर्नवर शिंपडलेल्या विविध पदार्थांमध्ये वापरले जाऊ शकते. हे व्हिटॅमिन बी 12 ची रोजची गरज सहजपणे पूर्ण करते.
दूध, दही आणि चीज यासारखे दुग्धजन्य पदार्थ व्हिटॅमिन बी 12 चे चांगले स्त्रोत आहेत. तुमच्या रोजच्या आहारात यांचा समावेश करून तुम्ही व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेवर मात करू शकता.
सीव्हीडमध्ये व्हिटॅमिन बी 12 देखील असते. जपानी आणि कोरियन पाककृतीमध्ये सीव्हीड्सचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.