bajra-ki-roti-with-seasame-benefits-in-winter-864x1536

बाजरी हे सुपरफूड आहे. बाजरी ग्लूटेन फ्री आहे. बाजरी खाण्याचे अनेक फायदे आहेत.

Tv9-Marathi

29 January 2025

bajra-ki-roti-with-seasame-benefits-in-winter-768x1365

बाजरीत प्रोटीन, पोटेशियम, मॅग्नीशियम, फायबर, कार्ब्स, मिनरल्स, व्हिटॅमिन आणि झिंकसह एंटीऑक्सीडेंट्स आहेत. 

 

हिवाळ्यात बाजरीच्या भाकरी मोठ्या प्रमाणावर खाल्ला जातात. बाजरी शरीरास गरम ठेवते. त्यात काही वस्तू मिक्स केल्यावर अधिक फायदा मिळतो. 

 

आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. किरण गुप्ता यांनी बाजरीच्या पिठात तीळ मिक्स करण्याचा सल्ला दिला. तसेच बाजरीच्या भाकरीसोबत गुळ खाल्ल्यास त्याचे अनेक फायदे मिळतात. 

 

बाजरी पोटासाठी वरदान आहे. त्यात तिळीसारख्या हेल्दी फूडाचा समावेश केल्यावर फायबर मुबलक प्रमाणात मिळते. त्यामुळे पाचनतंत्र चांगले होते. 

 

बाजरी आणि तीळ सोबत सेवन केल्यावर कॅल्शियम जास्त मिळते. तसेच आपली हाडे आणि स्नायू मजबूत होतात. मॅग्नीशियम आणि पॉटेशियम त्यातून मिळतात. 

 

तुम्हाला हिमोग्लोबिन कमी असेल किंवा अशक्तपणा असेल तर त्याने बाजरीचे पदार्थ खावेत. बाजरीच्या पिठात तीळ आणि गूळ मिसळून शरीराला ॲनिमियापासून दूर ठेवता येते.

 

बाजरीच्या पिठात तीळ मिक्स खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. शरीरात चपळता असल्याने कामावरही परिणाम होत नाही. म्हणूनच, जर तुम्हाला हिवाळ्यात सक्रिय आणि उत्साही राहायचे असेल, तर बाजरी आणि तीळ खाणे सुरू करा.