धनत्रयोदशीच्या दिवशी या 5 गोष्टी खरेदी करणं असतं शुभ

26 October 2024

Created By : Manasi Mande

धनत्रयोदशीचा दिवस हा लक्ष्मी आणि कुबेराला समर्पित असतो. या दिवशी काही खास गोष्टी खरेदी करणं शुभ मानलं जातं. त्यामुळे समृद्धी येते.

सोन-चांदी धनाचे प्रतीक मानले जाते. धनत्रयोदशीला सोन्या-चांदीची नाणी किंवा दागिने खरेदी करणे शुभ मानले जाते.

लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो घरात लावणं शुभ मानलं जातं. धनत्रयोदशीला लक्ष्मीच्या मूर्तीची पूजा केल्याने सुख-समृद्धी येते.

शेतीची उपकरणं, अवजार, मशीन खरेदी केल्यानेही व्यापारात वृद्धी होते आणि धनलाभ होतो असे मानले जाते.

स्टील, तांबं आणि पितळेची भांडी विकत घेणंही शुभ मानलं जातं.

धार्मिक ग्रंथ आणि पूजेचं सामानं विकत घेणंही शुभ मानलं जातं.