पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक प्राण्याचा मृत्यू होत असतो. त्यामुळे पृथ्वीला मृत्यूलोक म्हटले जाते.
14 April 2025
Created By : Jitendra Zavar
बीबीसीच्या अर्थ रिपोर्टनुसार, पृथ्वीवरील एक प्राणी वय झाल्यामुळे कधीच मरत नाही. म्हणजेच तो अमर असल्याचे म्हणता येईल.
पृथ्वीवरील जेलीफिश प्रजाती टुरिटोप्सिस डोहर्नी (Turritopsis dohrnii) अमर आहे. तो वृद्ध झाल्यानंतर पुन्हा किशोर अवस्थेत येतो.
टुरिटोप्सिस डोहर्नीच्या या प्रक्रियेस ट्रांसडिफरेंशिएशन म्हटले जाते. त्याच्या पेशी एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात बदलतात.
टुरिटोप्सिस डोहर्नीचे जीवन एका अळ्यापासून सुरू होते. जे पॉलीपमध्ये विकसित होते. हे क्लोन तयार करतात आणि मेडुसा (प्रौढ) जेलीफिश तयार करतात.
शास्त्रज्ञांच्या मते जेलीफिश पुन्हा पुन्हा त्याचे जीवनचक्र पुनरावृत्ती करू शकते. ज्यामुळे ती जैविक दृष्ट्या ते अमर बनते.
वय वाढणे हे टुरिटोप्सिस डोहर्नीच्या मृत्यूचे कारण होत नाही. परंतु एखादा मोठ्या मासाने खाल्ले किंवा गंभीर आजार झाला तर त्याचा मृत्यू होता.
हे ही वाचा...
Thanks अन् Thank You या दोन शब्दांमध्ये फरक आहे. त्याची माहिती अनेकांना नसते.