भारताच्या घराघरात कांदा वापरला जातो. कांद्याशिवाय अनेक किचनमध्ये स्वयंपाक होत नाही.
7 April 2025
Created By : Jitendra Zavar
ग्रामीण भागात शेतकरी कांदा भाकर अशी न्याहारी घेऊनच शेतात जातात. शहरांमध्ये सलाद म्हणून अनेक जण कांदा खातात.
भारतातील एका ठिकाणी कांदा खाणे, कांदा विकणे याला पूर्णपणे बंदी आहे, याबद्दल अनेकांना माहिती नसेल.
जम्मू-काश्मीरमधील कटरा येथे कांद्याचे सेवन पूर्णपणे बंद आहे. दुकाने किंवा भाजी विक्रेत्यांकडे या ठिकाणी कांदा मिळत नाही.
कटरा हे माता वैष्णो देवीचे धार्मिक स्थळ आहे. लाखो भक्त रोज माताराणीच्या दर्शनासाठी कटरामध्ये येत असतात.
लोकांची धार्मिक श्रद्धा लक्षात घेऊन सरकारने कटरामध्ये कांदा विक्री आणि सेवन करण्यास बंदी आणली आहे.
कटरामधील घराघरातच नव्हे तर हॉटेलमध्येसुद्धा कांद्याची फोडणी दिली जात नाही. कच्चा कांदाही या ठिकाणी कोणी खात नाही.
हे ही वाचा...
मोबाईलबाबत बाबा वेंगा यांची भीतीदायक भविष्यवाणी