भारतात कोट्यवधी नागरिक रोज रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेकडून त्यांना अनेक सुविधा दिल्या जातात.
22 March 2025
रेल्वेने प्रवास करणाऱ्यांनी रेल्वे क्रॉसींग पहिले असतील. परंतु चार बाजूंनी ट्रेन येणारे क्रॉसींग पाहिले का?
चारही बाजूंनी ट्रेन येणारे हे क्रॉसींग देशात एकाच ठिकाणी आहे. ते ही महाराष्ट्रात आहेत. त्या ठिकाणी चारही बाजूंनी रेल्वे येते.
रेल्वेच्या या अनोख्या क्रॉसींगला डायमंड क्रॉसींग म्हटले जाते. चारही बाजूंनी ट्रेन आल्यावर या ठिकाणी कधी अपघात होत नाही.
या जागेवरून रेल्वेचे चार रुळ जातात. ज्यामुळे त्याला डायमंड प्रमाणे आकार तयार होतो. यामुळेच या जागेला डायमंड क्रॉसिंग म्हटले जाते.
नागपूरमधील संप्रीति नगर स्थित मोहन नगरमध्ये हे डायमंड क्रॉसिंग आहे. इथे कोणालाही जास्त वेळ उभे राहण्याची परवानगी नसते.
देश-विदेशातून अनेकजण डायमंड क्रॉसिंग पाहण्यासाठी या जागेला भेट देतात. भारतीय रेल्वेची ही अनोखी जागा आहे.
रेल्वेचा एक ट्रॅक पूर्वेकडील गोंदियाकडून तर दुसरा दक्षिण भारतातून येतो. तिसरा उत्तरेकडून म्हणजेच दिल्लीकडून तर चौथा मुंबईकडून येतो.
हे ही वाचा... व्हिटॅमिन B 12 वाढवण्यासाठी सकाळी खा हे ड्रॉयफ्रूट