पाकिस्तान कोणाशी सर्वाधिक व्यापार करतो? नाव ऐकाल तर...

3 December 2024

Created By: Atul Kamble

 स्टेट बॅंक ऑफ पाकिस्तानने जाहीर केलेल्या आकडेवारीत पाक कोणाशी सर्वात जास्त व्यापार करतो याचे आकडे दिलेत

 रिपोर्टनुसार पाकिस्तान आपले सर्वाधिक साहित्य अमेरिकेला विकतो

या वर्षाच्या पहिल्या चार महिन्यात पाकने अमेरिकेला २०३७ मिलियन डॉलरचे साहित्य विकले आहे

अमेरिकेला केलेली निर्यात गेल्यावर्षी पेक्षा १८६२.०९ दशलक्ष डॉलरहून ९.४ टक्के जास्त आहे

अमेरिकेनंतर पाकिस्तानने चीनशी सर्वाधिक व्यापार केलेला आहे.

पहिल्या चार महिन्यात पाकने चीनला ८१३.४४ दशलक्ष डॉलर साहित्य विकलेय

तिसऱ्या क्रमांकावर ब्रिटन आहे. युकेला पाकिस्तानने ७६१.३९ दशलक्ष डॉलरचे साहित्य विकलेय

युएई या यादीत चौथ्या स्थानावर आहे.पाकने ७३७.४३ दशलक्ष डॉलरचे साहित्य युएईला विकले आहे