नदीत पैसे फेकल्याने खरोखरच इच्छा पूर्ण होतात?; प्रेमानंद महाराजांनी सांगितलं अखेर सत्य

नदीत पैसे फेकल्याने खरोखरच इच्छा पूर्ण होतात?; प्रेमानंद महाराजांनी सांगितलं अखेर सत्य 

28 April 2025

Created By : Manasi Mande

जेव्हा आमिरने दिला रजनीकांत यांना नकार..

असं मानलं जातं की पवित्र नदीत पैसे किंवा नाणं फेकल्याने मनोकामना पूर्ण होते. संत प्रेमानंद महाराजांनी याबाबतचं सत्य सांगितलं.

गंगा असो किंवा यमुना, एक रुपयाचं पीठ घेऊन, ते मळून गोळा बनवा आणि नदीत टाका. तेथील मासे आणि कासवं ते खातील.

रुपया किंवा नाणं नदीत टाकल्याने काय होणार ? त्याच रुपयांनी वस्तू खरेदी करून कोणाला तरी द्या, ते पैसे नदीत टाकण्याची काही गरज नाही, असं प्रेमानंद महाराजांनी प्रवचनात सांगितलं.  

हे ( पैसे टाकणं) कोणत्याही शास्त्रात सांगितलेलं नाही, हे फक्त आपल्या मनाने लोक करत असतात.

एक-एक रुपया दान करायचा असेल तर ते पैसे जमवा आणि साठवून ठेवा.

असे पैसे जमवून ठेवा आणि 100 रुपये साठले की त्याचं हिरवं गवत घेऊन गाईला द्या किंवा एखाद्या आजारी व्यक्तीला ते पैसे द्या.

गरीब व्यक्तीला त्याच 100 रुपयांचं जेवण द्या, नदीत पैसे टाकून काय मिळणार ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

नदीत पैसे टाकल्याने काही इच्छा पूर्ण होत नाहीत, उलट त्याने नदीतील जीवांनाच त्रास होतो, असंही त्यांनी पुढे सांगितलं.