शरीरात रक्ताची कमी झाल्यास त्वरीत तुमच्या आहारात मनुके म्हणजे किशमिश समावेश करा.
किशमिश पचन सुधारण्यास, प्रतिकारशक्ती वाढवण्यास, हृदयाचे आरोग्य सुधारण्यास आणि रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत करतात.
किशमिशमध्ये आयरन, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि एंटीऑक्सीडेंट्स असतात. यामुळे शरीरातील रक्त वाढते.
आयरन लाल रक्तपेशींच्या निर्मितीमध्येही महत्वाची भूमिका बजावते. जेव्हा शरीरात आयरनची कमतरता होते तेव्हा शरीराला पुरेसे रक्त मिळत नाही आणि अशक्तपणा जाणवतो.
मनुकामध्ये आयरन जास्त असते. त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते आणि ॲनिमियाची समस्या दूर होते.
मनुके रात्रभर पाण्यात भिजवून खाल्ल्यास त्यातील पोषक घटक अधिक प्रभावी होतात. तसेच ते शरीरात लवकर शोषून घेते.