देश असावा तर असा, इथं भिकारीही करोडपती
19 September 2024
Created By : Manasi Mande
मुंबईचे रहिवासी असलेले भरत जैन देशातल सर्वात श्रीमंत भिकारी आहेत. त्यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे.
एका रिपोर्टनुसार, 54 वर्षाचे भरत जैन गेल्या 10 वर्षांपासून भीक मागत आहेत.
ते बऱ्याच वेळा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा आझाद मैदानाच्या आसपास भीक मागताना दिसतात.
रिपोर्टनुसार, भरत जैन एका दिवसात 2 ते अडीच हजार रुपये भीक मागून कमावतात, दिवसाचे 10-12 तास ते काम करतात.
भरत जैन हे भिकारी असले तरी त्यांची धन-संपत्ती ऐकाल, तर तुमचेही डोळे विस्फारतील.
भरत यांच्याकडे परळमध्ये 2 बीएचके फ्लॅट ज्याची किंमत 1 कोटीच्या आसपास आहे. तेथे ते पत्नी, मुलं, भाऊ आणि वडिलांसह राहतात.
एवढंच नव्हे तर ठाण्यात त्यांची दोन दुकानंही असून त्याच्या भाड्यापोटी महीना 30 हजार मिळतात. एक स्टेशनरी स्टोअरही आहे.
त्यांनी काही उद्योगातही पैसा गुंतवला असून रिपोर्ट्सनुसार त्यांची संपत्ती 7 कोटींच्या आसपास आहे.
मोर शाकाहारी की मांसाहारी? फक्त ‘या’ लोकांनीच…
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा