अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स चक्क चालणे, बसणे आणि झोपणे विसरल्या...
29 January 2025
Created By: atul kambl
e
२३७ दिवसांपासून अंतराळात अडकेल्या सुनीता विल्यम्स या पृथ्वीवर येण्याआधी चालण्याची प्रॅक्टीस करीत आहेत
सुनीता यांनी Needham हायस्कुलच्या विद्यार्थांशी संवाद साधताना ही माहिती दिली आहे
अंतराळवीर सुनीता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकल्या आहेत.मुक्काम एवढा वाढेल असे वाटले नव्हते
५९ वर्षीय भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स बसणे, झोपणे आणि चालणे देखील विसरल्या आहेत
मी सर्व दैनंदिन गोष्टी आठवण्याचा प्रयत्न करीत आहे असे त्यांनी विद्यार्थ्यांशी बोलताना सांगितले
आपण खूप काळापासून येथे असल्याने मला आठवत नाही की कसे चालावे? कारण येथे त्याची गरज नसते
सुनीता यांच्या मते येथे केवळ डोळे बंद करून जेथे आहोत तेथे तरंगत रहावे लागते
सुनीता यांच्या सोबत बुच विल्मोर देखील आहेत. ते महिनाभरात परतणार होते. परंतू हा मुक्काम वाढलाय
जून २०२४ मध्ये सुनीता आणि विल्मोर अंतराळ स्थानकात पोहचले होते,यान बिघाडल्याने त्यांची पृथ्वी वापसी रखडली
आता नासाच्या मते नवीन अंतराळ यान तयार करुन मार्च २०२५पर्यंत त्यांना पृथ्वीवर आणले जाईल
सुनीता यांच्या वापसीसाठी SpaceX आणि नासा यांनी मिळून ड्रॅगन कॅप्सुल तयार केली आहे
महिनाभर रोज तांदळाचे पाणी चेहऱ्यास लावल्याने काय फायदा होईल ?