आकाशात शुक्र,मंगळ, गुरु आणि शनि पुढच्या आठवड्यात या दिवशी एका पंगतीत!

15 जानेवारी 2025

सुर्यास्तानंतर लागलीच दक्षिण-पश्चिम अवकाशात २१ जानेवारीला शुक्र ग्रह चमकताना दिसेल

डोक्यावर आभाळात रात्रभर गुरु ग्रह चमकताना दिसणार असून टेलिस्कोपमधून लख्ख दिसेल

पूर्व आकाशात सायंकाळी पृथ्वीच्या जवळ लाल तारा मंगळ चमकताना दिसेल

 सायंकाळ होताच द.पश्चिम अवकाशात शुक्र ग्रहाच्या शेजारी कडी असलेला शनि ग्रह दिसेल

सौरमालेतील हे सर्व ग्रह एका सरळ रेषेत तुम्हाला आकाशात पाहायला मिळतील

ही घटना दुर्मिळ नसली तरी त्याच्या निखळ सौदर्यासाठी पाहायला हवी असे नासाने म्हटले आहे

 नासाने हे विलोभनीय दृश्य पाहाण्यासाठी बायनाकुलर किंवा टेलिस्कोपचा वापर करावा

या आकाशातील परेडचे सौदर्य खगोल अभ्यासकांसाठी एखाद्या पर्वणीप्रमाणे आहे.