27 नोव्हेबर 2024
माचिस की लाईटर! जगात पहिलं काय आलं? माहिती आहे का?
माचिस आणि लाईटरकडे पाहिलं की या जगात पहिलं कोण आलं? हा प्रश्न आल्याशिवाय राहात नाही.
माचिस पहिलं की लाईटर, दोघांच्या शोध कधी लागला याबाबत जाणून घेऊयात.
लाईटरचा शोध 1823 मध्ये लागला होता. जर्मन केमिस्ट जोहान वोल्फगँग डोबेराइनर यांनी लावला होता. याचं नावंही त्यांच्या नावावरून पडलं होतं.
लाईटरचे शोधकर्ते जोहान वोल्फगँग डोबेराइनर यांच्या नावावरून डोबेराइनर लॅम्प असं नाव ठेवलं होतं.
पहिल्या माचिसचा शोध 1826 मध्ये लागला होता. जॉन वॉकर यांनी याचा शोध लावला होता. त्यांनी याचा प्रयोग केला होता.
जॉन यांच्या मते, एका स्टिकला केमिकल लावून घासलं तर आग निघते. यामुळे माचिसचा शोध लागला.
दोघांचे शोधवर्ष पाहिली तर लाईटर पहिलं या जगात आलं. तर माचिसचा शोध नंतर लागला.