20 डिसेंबर 2024
गुगलवर पाकिस्तानी सर्वात जास्त काय सर्च करतात?
2024 वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. गुगलने सर्च लिस्ट जाहीर केली आहे. जगभरातील देश काय सर्च करतात याचा डाटा दिला आहे.
पाकिस्तानातील युजर्स गुगलवर काय सर्च करतात याचंही पितळ उघड झालं आहे. पाकिस्तानने 2024 मध्ये काय सर्च केलं याची हिस्ट्री समोर आली आहे.
पाकिस्तानने या वर्षात गुगलवर सर्वाधिक क्रिकेटबाबत सर्च केलं आहे. टी20 वर्ल्डकप, शोएब मलिक आणि साजिद खान टॉपिक सर्चमध्ये आघाडीवर आहेत.
बॉलिवूड सिनेमे, शो आणि वेब सीरिज हीरामंडी, 12वी फेल, एनिमल, मिर्जापूर सिझन 3, स्त्री 2, इश्क मुर्शिद, भूल भुलैया 3, डंकी, बिग बॉस 17 आणि कभी मै कभी तुम सर्च केलं आहे.
पाकिस्तानने चॅटजीपीटी लॉगिन, बिंग इमेज क्रिएटर, इन्फिनिक्स नोट 30, विवो वाय 100, जेमिनी, आयफोन 16 प्रो मॅक्सही सर्च केलं आहे.
हाउ टू मेक मिलियंस बिफोर ग्रँडमा, हाउ टू बाय ए युज्ड कार, हाउ टू मेक फ्लॉवर लास्ट लाँगर, हाउ टू डाउनलोड यूट्यूब व्हिडीओ इन पीसी, हाउ टू अर्न विदाउट इनव्हेस्टमेंट असंही सर्च केलं आहे.
पाकिस्तानात गुगलवर फिल्म स्त्री 2, एनिमल सिनेमा सर्वाधिक सर्च झाला. तर भारतातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याबाबतही सर्च केलं गेलं.