रात्री दान दिल्याने काय होतं ? या वस्तू तर बिलकूल दान देऊ नका...
21 March 2025
Created By : Manasi Mande
हिंदू धर्मात अनेक काळापासून दान देण्याची परंपरा आहे. दानाचे खूप महत्व असतं. ते अतिशय पुण्याचं काम मानलं जातं.
हिंदू धर्म शास्त्रानुसार दानाचे काही नियम आहेत. धर्मशास्त्रानुसार, रात्री दान करावे की नाही ते जाणून घेऊया.
सूर्यास्तानंतर किंवा रात्री दान करणे वर्ज्य असते. सूर्यास्तानंतर किंवा रात्री दान केल्याने घरी त्रास आणि धनाची हानी होऊ शकते. या गोष्टी तर बिलकूल दान करू नयेत.
सूर्यास्तानंतर कोणालाही धन म्हणजेच पैसे देऊ नयेत. असं केल्याने लक्ष्मीचा अपमान होतो असं म्हणतात. आर्थिक अडचणीही येऊ शकतात.
सूर्यास्तानंतर किंवा रात्री कोणालाही दूध दान देऊ नये. त्यामुळे घरात वास्तू दोष होऊ शकतो.
रात्रीच्या वेळेस कोणालाही दही दान देऊ नका. असं केल्याने पैशांचं नुकसान होऊ शकतं.
सूर्यास्तानंतर हळद दान करणं शुभ मानलं जात नाही , त्यामुळे गुरु ग्रह कमजोर होऊ शकतो.