26 नोव्हेबर 2024
पाणीपुरीला इंग्रजीत नेमकं काय बोलतात? तुम्हाला माहिती आहे का?
पाणीपुरीचे कोट्यवधी चाहते भारतात आहेत. पाणीपुरीला वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळी नावं आहेत.
उत्तर भारतात पाणीपुरी, पूर्व भारतात फुचका आणि गुपचूप, तर हरियाणाता पाणी पताशी बोललं जातं.
गुजरातमध्ये पाणीपुरीला पकौडी संबोधलं जातं. ओडिशात गुपचूप आणि मध्यप्रदेशात फुल्की संबोधलं जातं.
पाणीपुरीची अनेक नाव भारतात प्रचलित आहेत. पण इंग्रजीत नेमकं काय बोलतात माहिती आहे का?
पाणीपुरीला इंग्रजीत वॉटर बॉल्स बोललं जातं. वॉटर म्हणजे पाणी आणि बॉल म्हणजे पुरी..
पाणीपुरी हा भारतीयांचा आवडता पदार्थ आहे. पण इंग्रजी नावाबाबत अनेकदा प्रश्न पडतो.
पाणीपुरीचं नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटतं. त्यामुळे लग्न समारंभ, पार्टी यात पाणीपुरीला महत्त्व असतं. खाण्यासाठी गर्दीही जमते.