गणरायाला दुर्वा का वाहतात ?
22 April 2025
Created By : Manasi Mande
गणपती बाप्पाला दुर्वा वाहणं खूप शुभ मानलं जातं. दुर्वा वाहिल्याने गणराया प्रसन्न होतो आणि भक्तांना आशिर्वाद देतो, असं मानलं जातं.
गणेशाला रोज दुर्वा वाहिल्याने लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. आणि सर्व विघ्नं दूर होतात.
गणेशाला दुर्वा वाहिल्याने जीवनात येणाऱ्या समस्यांशी लढण्याचं मानसिक बळ मिळतं आणि भक्त जीवनात कधी हरत नाहीत.
ज्या लोकांना करिअरमध्ये यश मिळत नाही, त्यांनी गणेशाला दुर्वा वाहिल्यान ते यशस्वी होतात. अडकलेली कामं पूर्ण होतात.
ज्यांना आर्थिक समस्या आहे, त्यांनी गणरायाला दुर्वा वाहिल्यास धनलाभ होतो आणि प्रगति होते, असं म्हणतात.
पौराणिक कथेनुसार, अनलासुर नावाच्या राक्षसाने देवतांना आणि मनुष्यांना खूप त्रास दिला. तेव्हा गणरायाने त्याला गिळले पण पोटात खूप जळजळ होऊ लागली.
मग 88 हजार ऋषींनी मिळून 21 दुर्वांच्या गाठी गणरायाला वाहिल्या. त्यामुळे गणरायाच्या पोटातील जळजळ कमी झाली. तेव्हापासूनच गणरायाला दुर्वा वाहण्यात येतात.
लग्नापूर्वी मनगटावर हळकुंडं का बांधतात ?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा