जगातील सर्वात जुने आणि सर्वाधिक सेवन केले जाणारे ड्रिक्स बिअर आहे.
31 डिसेंबर 2024
आरोग्य तज्ज्ञांनुसार, कधी कधी थंड बिअर घेतल्याने आरोग्यावर कोणताही गंभीर परिणाम होत नाही.
नियमित बिअरचे सेवन केल्यावर त्याचे अनेक वाईट परिणाम आरोग्यावर होतात.
सलग 21 दिवस बिअर घेतल्यास काय परिणाम होतात, जाणून घेऊ या.
रोज बिअर घेतल्यावर सर्वात जास्त परिणाम वजनावर होतो. यामध्ये असणाऱ्या कॅलरीमुळे पोटाच्या जवळपास चरबी वाढते.
बिअरमुळे फॅटी लिव्हर, अल्कोहलिक हेपेटाइटिस आणि सिरोसिस यासारखे यकृतचे आजार होतात.
21 दिवस सलग बिअर घेतल्यावर डिहाइड्रेशनचा आजार होतो. त्यामुळे लघवीचा त्रास होतो. त्यामुळे शरीरातील पाणी कमी होते.
नियमितपणे बिअर घेतल्यावर त्याचा मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकते. यामुळे नैराश्य आण
ि चिंता यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
सतत बिअर पिल्याने हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. कार्डिओमायोपॅथी आणि स्ट्रोक यासारख्या हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही वाढतो.
जास्त प्रमाणात बिअर प्यायल्याने झोपेचे चक्र देखील बिघडते, ज्यामुळे थकवा आणि निद्रानाश होऊ शकतो.
हे ही वाचा... नशीब बदलण्यापूर्वी काय मिळतात शुभ संकेत, नीम करोली बाबा यांनी सांगितले