खिरे म्हणजे काकडी हे एक पित्तशामक फळ आहे. काकडी स्वादीष्ट आणि उष्णतेचा त्रास कमी करते.
26 March 2025
Created By : Jitendra Zavar
काकडीमध्ये आहारातील फायबर भरपूर प्रमाणात असते, जे निरोगी पचनास प्रोत्साहन देते. उन्हाळ्यात शरीरास हायड्रेट ठेवतो.
खिऱ्यामध्ये व्हिटामिन, एंटीऑक्सीडेंट्स, कॉपर, मंगनीज, मॅग्नीशियम आणि पोटॅशियम असतात. हे घटक आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
डायटीशियन मोहिनी डोंगरे म्हणतात, रात्री जेवणापूर्वी 20 मिनिटे आधी काकडी खाणे खूप फायदेशीर आहे. त्यामुळे त्वचा चमकदार होते. यामध्ये असणारी सिलिका आणि व्हिटॅमिन सी स्किन त्वचेसाठी फायदेशीर आहे.
काकडीत फायबर आणि पाणी मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे पोटासाठी ते फायदेशीर आहे. हे खाल्यामुळे पोटात जडपणा वाटत नाही.
काकडीमुळे शरीरातील कॅलरी कमी होते. भूक कमी करणे अन् वजन कंट्रोल करण्यासाठी ते फायदेशीर आहे.
काकडीमध्ये व्हिटॅमिन आणि कॅल्शियम असतात. ते हाडे मजबूत करतात. परंतु जेवणाच्या 20 मिनिटांपूर्वी ते सेवन करावे.
काकडीच्या चकत्या डोळ्यांवर व चेहऱ्यावर ठेवल्यास थंडावा मिळतो. त्वचेसाठी काकडी फायदेशीर आहे.
गुडघे दुखीला दूर करण्यासाठी जेवणात काकडीचे सेवन जास्त प्रमाणात करायला हवे.