केळी अन् सफरचंद सोबत खाल्यामुळे शरीरावर काय परिणाम होतो? याबाबत तुम्ही कधी विचार केला आहे का?

8 November 2024

केळीत पोटेशियम, व्हिटॅमिन B 6,  व्हिटॅमिन C आणि फायबर असते. यामुळे शरीराला उर्जा मिळते आणि पचनक्रिया चांगली राहते.

सफरचंदात व्हिटॅमिन C, पोटेशियम आणि एंटीऑक्सीडेंट असते. ते ह्रदयासाठी चांगले असते. 

केळी आणि सफरचंद सोबत खाल्यास मुबलक फायबर मिळते. पंचनक्रिया चांगली राहते. 

केळी आणि सफरचंदमध्ये एंटीऑक्सीडेंट्स आणि व्हिटॅमिन मुबलक असते. त्यामुळे रोगप्रतिकार क्षमता वाढते. 

केळीत पोटेशियम आणि सफरचंदात फायबर असते. त्यामुळे ह्रदय हेल्दी राहते. रक्तदाब नियंत्रणात असतो.

तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर केळी आणि सफरचंद सोबत खाणे चांगला पर्याय आहे. दोघांमध्ये कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असतात.

केळी आणि सफरचंद जास्त प्रमाणात सेवन केल्यास पोटात गॅस निर्माण होऊ शकतो. जास्त फायबरमुळे पोट खराब होण्याची समस्या निर्माण होते.