tahawwur-rana-2

अंडा सेल म्हणजे काय? तहव्वुर राणाला येथे ठेवलं जाणार!

10 एप्रिल 2025

Created By:  राकेश ठाकुर

Tv9-Marathi
crime-sean-mumbai-attack

26/11 मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला भारतात आणलं आहे. त्याला तिहारच्या अंडा सेलमध्ये ठेवलं जाणार आहे. 

anda-cell-interesting-facts

अंडा सेल हे तुरुंगातील सर्वात सुरक्षित भाग असतो. अंड्याच्या आकाराचा असल्याने याला अंडा सेल म्हणतात.

yakub-memon

अंडा सेलमध्ये गंभीर गुन्हे करणाऱ्या धोकादायक आरोपींना ठेवलं जातं. याकुब मेनन आणि अफजल अन्सारी यानाही यात ठेवलं होतं.

अंडा सेलमध्ये वीज कनेक्शन नसतं. त्यामुळे कैदी अंधारात राहतो. सुरक्षेसाठी बाहेरून विद्युत कुंपणाने झाकलेले असते. 

अंडा सेलमध्ये एकच बेड असतो. सुरक्षा कर्मचारी त्यावर लक्ष ठेवून असते. फोन कॉल्स आणि भेटीवरही लक्ष ठेवले जाते. 

सीसीटीव्हीने सुसज्ज असलेली ही खोली बॉम्बप्रुफ असते. मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये 8 अंडा सेल आहेत.

तहव्वुर राणासारख्या गुन्हेगारांना तुरुंगात ठेवणं एक आव्हान असल्याचं माजी पोलिसांचं म्हणणं आहे. म्हणूनच अंडा सेलची निवड करण्यात आली आहे.