ghibli-studio-art

'घिबली'च्या प्रेमात पडलात! पण त्याचा मराठीत नेमका अर्थ काय? जाणून घ्या

1 एप्रिल 2025

Created By:  राकेश ठाकुर

Tv9-Marathi
ghibli-picturess

भारतात घिबली (Ghibli) स्टुडिओ आर्टची क्रेझ वाढली आहे. सोशल मीडियावर आता हा ट्रेंड सुरु आहे. 

ghibli-studio-art-founder-pic-1

जापानमध्ये घिबली स्टुडिओच्या नावाने सुरु झालेल्या आर्टची चर्चा आहे. पण तुम्हाला घिबलीचा अर्थ माहिती आहे का?

arabic-history

घिबली हा अरबी भाषेतील शब्द असल्याचं सांगितलं जात आहे. या शब्दाचा वापर उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांसाठी वापरला जातो. 

सहारा वाळवंटातील उष्ण वाऱ्यांसाठी घिबली हा शब्द वापरला जातो. अनेक देशांमध्ये वाऱ्यासाठी या शब्दाचा वापर होतो. 

लिबियामध्ये घिबली हा शब्द वाऱ्यासाठी वापरला जातो. मग जापानमध्ये या कलेला घिबली हे नाव देण्याचं कारण काय?

घिबली कला शैलीचे संस्थापक हयाओ मियाझाकी यांनी एनिमेशन उद्योगाला 'हवा' देण्यासाठी त्याची सुरुवात केली. 

ही कला मियाझाकीसाठी एक मोठी कलाकृती ठरली. यामुळे एनिमेशन उद्योगाला चालना मिळाली आणि ही कला जगभर लोकप्रिय झाली.