वक्फचा मराठीत नेमका अर्थ काय? कुठून आला हा शब्द? जाणून घ्या
2 एप्रिल 2025
Created By: राकेश ठाकुर
वक्फ दुरूस्ती विधेयक 2024 लोकसभेत मांडण्यात आलं आहे. पण या विधेयकाला विरोधी पक्ष विरोध करत आहे.
वक्फ हा अरबी शब्द आहे. हा शब्द वाकुफा शब्दापासून आला आहे. याचा अर्थ थांबणं किंवा थांबवणं असा होतो.
वक्फ म्हणजे अशी मालमत्ता जी सार्वजनिक कल्याणासाठी वापरली जाते किंवा वापरली जाणार आहे.
मराठीत वक्फचा अर्थ जतन करणे. सार्वजनिक कल्याणासाठी दान केलेल्या मालमत्तेचे संरक्षण करणे म्हणजेच वक्फ..
जो व्यक्ती आपली मालमत्ता लोकांच्या कल्याणासाठी देतो त्याला वकीफ म्हणतात.
इतिहासकारांच्या मते, भारतात वक्फची परंपरा 1400 वर्षे जुनी आहे. आता केंद्र सरकारने यात नवीन दुरुस्ती विधेयक आणलं आहे.
काँग्रेसने हे विधेयक अल्पसंख्यांकविरोधी असल्याचं म्हंटलं आहे. काही मुस्लिम संघटनानी याला विरोध केला आहे.